अदानी यांच्या कंपनीने इस्त्राईल मधील एका कंपनीसोबत भागीदारी केली असून त्याअंतर्गत हैदराबाद शहरात अत्याधुनिक ड्रोन निर्मिती केली जाणार आहे.

एलबिट सिस्टम्सचे हरमिस ९०० ड्रोन

एलबिट सिस्टम्सचे हरमिस ९०० ड्रोन

अदानी यांच्या ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ या कंपनीने इस्राईलच्या ‘एलबिट सिस्टम्स’ या कंपनीसोबत मिळून हैदराबाद येथे अत्याधुनिक ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हरमिस ९०० आणि हरमिस ४५० हे जगातील अत्याधुनिक ड्रोन तयार केले जातील. अशाप्रकारचा हा भारतातील पहिलाच खाजगी प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यात दीड कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाईल. उपखंडातील भारत सरकारच्या धोरणात्मक नियोजनामध्ये संरक्षणात्मक दृष्टिकोनातून या प्रकल्पातील ड्रोन उपयोगात आणले जाणार आहेत.

Advertisements
error: Content is protected !!