२९. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : अरिदमॉमिटर

कार्यालयीन कामकाजात वृद्धी होऊ लागली, तशी वेगवान आकडेमोड करण्याची गरजही वाढू लागली. आकडेमोड करण्याकरिता आता एखाद्या यंत्राची आवश्यकता होती. तेंव्हा १९व्या शतकाच्या पूर्वार्धातच त्यादिशेने प्रयत्न सुरु झाले. चार्ल्स बॅबेज यांनी १८२२ साली ‘डिफरन्स इंजिन’ची कल्पना मांडली. पण त्यापूर्वी दोन वर्षं आधी म्हणजेच १८२० साली थॉमस दी कोलमार यांनी फ्रान्समध्ये ‘अरिदमॉमिटर’चे पेटंट घेतले होते. थॉमस यांचे हे यंत्र बेरिज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यास सक्षम होते. ‘अरिदमॉमिटर’ मजबूत होते, शिवाय हे यंत्र बर्‍यापैकी विश्वासार्ह देखील होते.

अरिदमॉमिटर

अरिदमॉमिटर

लहान-सहान आकडेमोड करण्यासाठी मात्र अरिदमॉमिटर फारसे उपयुक्त नव्हते. कारण या यंत्राची गती अशाप्रकारची आकडेमोड करण्यास पुरक नव्हती. परंतु संख्या जर आकाराने मोठी असेल, तर मात्र अचूक उत्तर मिळविण्याकरिता अरिदमॉमिटरचा चांगला उपयोग होत होता. खास करुन इन्श्युरन्सच्या व्यवसायात अशाप्रकारची आकडेमोड करावी लागत असे. थॉमस दी कोलमार हे स्वतः इन्श्युरन्स क्षेत्रातील आघाडीचे व्यवसायिक होते. त्यामुळे ते इन्श्युरन्सच्या कामात व्यस्त असत. अशाने अरिदमॉमिटरचे पेटंट घेऊनही साधारणतः पुढील ३० वर्षं ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. १८८० पर्यंत अरिदमॉमिटरची विश्वासार्हता व गुणवत्ता वाढत गेली, परंतु ते कधी लक्षणीयरित्या विकले गेले नाही. तरी १९१४ सालापर्यंत अरिदमॉमिटरची निर्मिती सुरु राहिली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!