‘न्यू होरायझन’ अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी ‘अल्टिमा थुली’ या सूर्यमालेतील दूरस्थ पिंडाजवळ पोहचत आहे.

नासाचे ‘न्यू होरायझन’ अंतराळयान सूर्यमालेतील एका दुरस्त पिंडाजवळ लवकरच पोहोचत आहे. या पिंडाला ‘अल्टिमा थुली’ असे नाव देण्यात आले असून तो वॉशिंग्टन शहराच्या आकाराचा आहे. केपलर बेल्ट मधील हा पिंड प्लुटो पासून सुमारे एक अब्ज मैल अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्टिमा थुली

न्यू होरायझन अंतराळयानाने ‘अल्टिमा थुली’चे घेतलेले पहिले छायाचित्र

‘न्यू होरायझन’ अंतराळयान १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी ‘अल्टिमा थुली’ जवळून जाईल. त्यानंतर तो पिंड नक्की कसा दिसतो? आणि नेमका कशापासून बनला आहे? ते कळू शकेल. अंतराळयानावरील कॅमेरे सध्या झूमइन केले जात आहेत, जेणेकरून या पिंडाचा आकार अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल. न्यू होरायझन अंतराळयान ताशी ५१ हजार ५०० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने अंतर कापत असून २०१५ साली त्याने प्लुटो या लघुग्रहाची सुरेख छायाचित्रे घेतली होती.

Advertisements
error: Content is protected !!