मंगळ मोहिमेवरील ‘इनसाइट मार्स लँडर’ने आपले यांत्रिक हात वापरून स्वतःचा सुरेख सेल्फी घेतला आहे.

सध्या सगळीकडे सेल्फीचे चलन असताना नासाचे ‘इनसाइट मार्स लँडर’ देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. २६ नोव्हेंबर रोजी मंगळावर उतरलेले ‘इनसाईट’ आता तेथे स्थिरस्थावर झाले असून त्याने आपले यांत्रिक हात लांबवून स्वतःचा पहिला सेल्फी घेतला आहे! या सेल्फीमध्ये आपण मंगळावरील तांबडी माती, इनसाइटचे सौरबाहू आणि वैज्ञानिक उपकरणे पाहू शकतो.

इनसाइट मार्स लँडर

इनसाइट मार्स लँडरने घेतलेला सेल्फी

इनसाइट वरील उपकरणांच्या सहाय्याने मंगळाच्या अंतरंगाचा व्यवस्थित अभ्यास करता यावा याकरिता इनसाइटला एका सपाट आणि दगड विरहित अशा सुरक्षित जागी उतरवण्यात आले होते. उल्कापातानंतर निर्माण झालेल्या विवरामध्ये कालांतराने वाळू भरली जाऊन अशाप्रकारची सपाट जागा त्या ठिकाणी निर्माण झाली होती.

Advertisements
error: Content is protected !!