‘इनसाईट मार्स लँडर’ मंगळावर उतरले

‘इनसाईट मार्स लँडर’ या नासाच्या मंगळ मोहिमेबाबत मला प्रचंड उत्सुकता होती. ‘इनसाईट’ मंगळकडे झेपावल्यापासून पाहता पाहता सहा महिने निघून गेले आणि दोन दिवसांपूर्वी ते मंगळावर अगदी सुखरूप उतरले. मंगळावरील वातावरणाचा दबाव पुरेसा नसल्याने बग्गी उतरावण्याच्या दृष्टीने मंगळाच्या जमिनीला स्पर्श करणे जिकरीचे मानले जाते. जगभरातील अंतराळ मोहिमांना याकामी अनेकदा अपयश आहे. अशाने ‘इनसाईट’ मंगळावर सुखरूप पोहचेपर्यंत या मोहिमेमागे कार्यरत असलेले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तसेच खगोलप्रेमी यांचा जीव टांगणीला लागला होता. सरतेशेवटी मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला! विशेष म्हणजे ‘इनसाईट मार्स लँडर’ने आता मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवण्यास सुरुवात देखील केली आहे.

इनसाईट मार्स लँडर - पहिला फोटो

इनसाईट मार्स लँडरने घेतलेला पहिला फोटो | सौजन्य : नासा

जेंव्हा एखाद्या मोहिमेमागे जीव ओतून काम केले जाते आणि ती मोहीम यशस्वी होते, तेंव्हा त्याचे एक वेगळेच समाधान असते. ‘इनसाईट’ मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ग्रह आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि भविष्यात या ग्रहावर वसाहत करण्याच्या दृष्टीने त्याचा पुष्कळ फायदा होईल हे निश्चित!

इनसाईट मार्स लँडर - मंगळ

इनसाईट मार्स लँडरने मंगळावर उतरल्यानंतर सभोवतालच्या परिसराचा घेतलेला एक सुरेख फोटो | सौजन्य : नासा

Advertisements
error: Content is protected !!