६२. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : व्हॅक्युम ट्यूब

सप्टेंबर १९४१ साली मॉकली यांनी ॲटॅनॅसऑफ यांना एक पत्र पाठवले. त्यात ॲटॅनॅसऑफ यांच्या काही कल्पना वापरण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. ॲटॅनॅसऑफ यांनी मॉकली यांना पेटंट घेईपर्यंत काही काळ थांबण्यास सांगितले. या पत्रावरुन जॉन मॉकली यांना ॲटॅनॅसऑफ यांच्या इलेक्ट्रॉनिक संगणकातून प्रेरणा मिळाल्याचे दिसते. तरी संगणकाकडे पाहण्याचा मॉकली यांचा स्वतःचा असा एक निराळा दृष्टीकोन होता!

इनिअॅक मधील व्हॅक्युम ट्यूब बदलताना

ऑगस्ट १९४२ मध्ये मॉकली यांनी वेगवान गणनेसाठी व्हॅक्युम ट्युबचा वापर करण्याची कल्पना सर्वांसमोर मांडली. पण व्हॅक्युम ट्युब या त्याकाळी अत्यंत महाग मिळत असत, शिवाय त्या नाजूकही असत. मॉकली यांची कल्पना सत्यात उतरवण्यास एकंदरीतच खूप मोठा खर्च आला असता. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या प्रस्तावाकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. परंतु तत्कालीन मेकॅनिकल संगणकाचे काम अत्यंत संथ गतीने चालत असे. त्यामुळे वेगवान असा नवा इलेक्ट्रॉनिक संगणक तयार करणे सर्वांकरिता निकडीचे होते. परंतु महायुद्धाच्या अपरिहार्यतेने अखेर मॉकली यांच्या कल्पनेस आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळवून दिले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!