६७. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : एडवॅकची संकल्पना

दरम्यान जॉन वॉन नॉयमन यांनी एडवॅक प्रकल्पाशी निगडीत काही माहिती लिहिली. त्यांच्या लिखाणाला अजून अंतिम स्वरुप मिळायचे होते. परंतु ३० जून १९४५ रोजी त्यांनी लिहिलेली माहिती प्रकल्पांतर्गत वर्तूळात वितरित झाली. त्यात त्यांनी नवीन प्रकारच्या संगणकाची संकल्पना मांडली होती. सोबतच ‘संगणक कसा असावा?’ याचे तार्किक विश्लेषण देखील केले होते. नवीन संगणकाच्या आत अज्ञावली साठवता येणार होती. यात संगणकाचे पाच प्रमुख भाग विषद करण्यात आले होते. इनपुट, मेमरी, कंट्रोल युनिट, अरिदमॅटिक युनिट आणि आऊटपुट असे ते पाच भाग होत. आज प्रत्येक संगणक मूळतः याच पाच भागांच्या आधारे काम करतो.

जॉन वॉन नॉयमन यांचा एडवॅक संदर्भातील रिपोर्ट

जॉन वॉन नॉयमन यांचा एडवॅक संदर्भातील रिपोर्ट

वॉन नॉयमन यांनी जी माहिती प्रकाशित केली, त्यावर केवळ त्यांचे एकट्याचे नाव नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आज अनेक लोक संगणकाच्या संकल्पनेचे श्रेय हे केवळ वॉन नॉयमन यांना देतात. परंतु खरं तर त्यात त्यांच्या इतर सहकार्‍यांचे देखील योगदान होते. वॉन नॉयमन यांनी लिहिलेली माहिती प्रथम प्रकल्पांतर्गत वर्तूळात वितरित करण्यात आली होती. परंतु नंतर ती त्या वर्तूळाच्या बाहेर पडली. वॉन नॉयमन व गोल्डस्टाईन यांना असे वाटत होते की, इनिॲक व एडवॅकचा खर्च सरकारने केला आहे, त्यामुळे या संकल्पना सर्वांसाठी खुल्या असाव्यात. परंतु एकर्ट व मॉकली मात्र त्या प्रकल्पांकडे व्यक्तिगत दृष्टीकोनातून पहात होते. त्यांना त्या प्रकल्पांचे पेटंट हवे होते. वॉन नॉयमन यांनी लिहिलेली माहिती प्रकल्पाच्या वर्तूळाबाहेर पडल्याने एकर्ट व मॉकली यांना पेटंट मिळवणे अवघड बनले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!