मोबाईल तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा कौशल्याने वापर करून घेता यावा यासाठी एरिक्सन कंपनीतर्फे बंगळुरू शहरात संशोधन विभाग सुरू करण्यात आला आहे.

एरिक्सन

‘सोनी एरिक्सन’ या मोबाईल कंपनीमुळे आपण ‘एरिक्सन’ हे नाव ऐकले असेल. एरिक्सन या दूरसंचार क्षेत्रातील स्वीडिश कंपनीने काळाची पाऊले ओळखून आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पदार्पण करायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने या कंपनीतर्फे बंगळुरू शहरामध्ये एक संशोधन विभाग सुरू करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने स्वयंचलित प्रज्ञासंपन्न व्यवस्था विकसित करणे हे या कंपनीचे उद्दिष्ट असेल. या प्रकल्पामधून या क्षेत्रातील तज्ञांसाठी बंगळुरू शहरात १५० नोकऱ्या उपलब्ध होतील. ५जी तंत्रज्ञान आणि ‘वस्तूंचे इंटरनेट’ (Internet of Things) दृष्टिपथात असताना मोबाईल नेटवर्कचा अधिक कौशल्याने व उपयुक्ततेने वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो असे एरिक्सन कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Advertisements
error: Content is protected !!