‘गुगल असिस्टंट’ आणि ‘ॲलेक्सा’ यांना एकमेकांबद्दल काय वाटतं? कृत्रिम बुद्धिमत्तेचा संवाद!

‘यंत्र’ आणि ‘मानव’ यांत विचारांचा फरक आहे. आपण जसा विचार करू शकतो, तसा यंत्राला विचार करता येत नाही. पण समजा जर यंत्रालाही विचार करता आला तर? किंवा आपण जसा संवाद साधतो, तसा यंत्रालाही संवाद साधता आला तर? यंत्रालाही विचार करता यावा, संवाद साधता यावा म्हणून ‘गुगल’ आणि ‘ॲमेझॉन’ कडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करण्यात येत आहे. गुगलने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘गुगल असिस्टंट’ असे नाव दिले आहे, तर ॲमेझॉनने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘ॲलेक्सा’ असे नाव दिले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या बाल्यावस्थेत असली, तरी तिचा वेगाने विकास होत आहे. समोरच्याशी संवाद साधण्याची कला कृत्रिम बुद्धिमत्ता अवगत करत असून याचेच एक गमतीशीर उदाहरण आज आपण पाहणार आहोत. यात आपण ‘गुगल असिस्टंट’ला विचारणार आहोत की, तिला ‘ॲलेक्सा’ बद्दल काय वाटते? आणि ‘ॲलेक्सा’ला विचारणार आहोत की, तिला ‘गुगल असिस्टंट’ बद्दल काय वाटते? याशिवाय आपण ‘गुगल असिस्टंट’ आणि ‘ॲलेक्सा’ यांना विचारणार आहोत की, ‘सिरी’ या ॲपलच्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल त्यांचं काय मत आहे?

Advertisements
error: Content is protected !!