आपण आत्ता कुठे ४के बद्दल ऐकू लागलो असताना, तिकडे जपानच्या सरकारी वाहिनीने कालपासून ८के प्रक्षेपणास सुरुवात केली आहे!

अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्यात जपान देश नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. मागील काही काळापासून NHK या जपानच्या सरकारी वाहिनीची ८के टीव्ही प्रक्षेपणाबाबत चाचपणी सुरू होती. आता या साऱ्या चाचण्या संपल्या असून कालपासून त्यांनी ८के प्रक्षेपणास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

८के टीव्ही

जपानमध्ये ८के तंत्रज्ञानाचा विकास होत आहे

८के म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ८के म्हणजे अधिक गुणवत्तेची फित (Video). तुलनात्मकरित्या सांगायचे झाले, तर ७२०पी म्हणजे ‘एचडी’, १०८०पी म्हणजे ‘फुल एचडी’, तर ४के म्हणजे ‘अल्ट्रा एचडी’. सध्या अल्ट्रा एचडी टीव्ही बाजारात आलेले आहेत.

८के मध्ये शूट करण्यासाठी खास प्रकारचा कॅमेरा लागतो. यामागील एकंदरीत तंत्रज्ञान आपल्याला खलील फितीमध्ये पाहायला मिळेल.

Advertisements
error: Content is protected !!