६०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : जॉन प्रेसपर एकर्ट

जॉन प्रेसपर एकर्ट यांचा जन्म ९ एप्रिल १९१९ रोजी झाला. रिएल इस्टेटचा व्यवसाय करुन त्यांचे वडिल स्वकष्टाने श्रीमंत झाले होते. जॉन मूळातच प्रतिभासंपन्न होते. शालेय वयात त्यांनी निरनिराळ्या स्पर्धा जिंकल्या, परिक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त केले. त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक वस्तू या खेळणीप्रमाणे होत्या! अशा वस्तूंशी निगडित कामे करुन ते हातखर्चाचे पैसे कमवत असत. शाळेतून सवड मिळाल्यानंतर ते अनेकदा फार्न्सवर्थ यांच्या प्रयोगशाळेत चक्कर टाकत. फार्न्सवर्थ यांनी १९२७ साली पहिला ‘इलेक्ट्रॉनिक टिव्ही’ तयार करुन दाखवला होता.

जॉन प्रेसपर एकर्ट

जॉन प्रेसपर एकर्ट

एकर्ट यांना एमआयटी या प्रतिष्ठित संस्थेत पुढील शिक्षण घ्यायचे होते. पण त्यांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडिलांची ईच्छा होती. शिवाय ते घरात एकूलते एक होते. त्यामुळे आपल्या मुलाने आपल्या जवळच रहावे असे त्यांच्या आईस वाटत होते. परिणामी एकर्ट यांनी पेन्सलवेनिया विद्यापिठात व्यावसायिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी महामंदी सुरु असल्याने त्यांच्या घरात आर्थिकदृष्ट्या थोडीशी तंग परिस्थिती होती. लवकरच त्यांना व्यावसायिक शिक्षणाचा कंटाळा आला. त्यांनी भौतिकशास्त्र विभागात बदली करुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे जागा शिल्लक नसल्याने १९३७ साली त्यांनी ‘मूरे स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’मध्ये प्रवेश घेतला.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!