ड्रोनशी निगडीत तंत्रज्ञानामुळे आता शेती आणि रेल्वेशी संबंधित प्रश्न सोडवणे सोपे होणार आहे.

वैमानिक विरहित लहान विमानाला ड्रोन म्हटले जाते. अशाप्रकारच्या विमानावर रिमोटच्या सहाय्याने दूर अंतरावरून नियंत्रण ठेवता येते. टेहळणी पासून ते सामान पोहचवण्यापर्यंत आजकाल सर्वत्र ड्रोनचा कौशल्याने वापर करून घेतला जात आहे. यामुळे वेळेची आणि ऊर्जेची देखील बचत होते.

ड्रोनचा शेतीसाठी वापर

परदेशाप्रमाणेच उपखंडातही आता ड्रोन तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले आहे. येथील आयआयटी रुडकीमध्ये संगणक विभागात कार्यरत असलेल्या एका चमूने ड्रोनशी निगडीत तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे शेती आणि रेल्वेशी संबंधित प्रश्न सोडवणे सोपे होणार आहे. जमिनीचा प्रकार, पिकांची स्थिती, आणि रेल्वे रुळांची परिस्थिती यासंदर्भातील अचूक निरीक्षणे या ड्रोनच्या साहाय्याने नोंदवता येतील. रेल्वे विभागाला तसेच अभ्यासपूर्ण शेती करणाऱ्यांना या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होऊ शकेल.

Advertisements
error: Content is protected !!