४१. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : आयबीएम अकांऊंटिंग मशिन : पहिले महायुद्ध

विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ होता. सुधारणेच्या वार्‍यासह पहिल्या महायुद्धाचे वारेही एव्हाना सर्वत्र घोंगावू लागले होते. युरोपीय साम्राज्यवादाच्या विरोधातील असंतोष जगभरातील एतद्देशीय लोकांमध्ये दाटून आला होता. समाजातील वंचित घटकांना नवे आत्मभान प्राप्त होऊ लागले होते. यातुनच पुढे सामाजिक पातळीवर काही नवे विचारप्रवाह व चळवळी उदयास आल्या. याकाळात कोल्हापूरचे शाहू महाराज अनेक लोककल्याणकारी योजना राबवत होते. दरम्यान राजकीयदृष्ट्या मवाळ गटाकडे असलेले महाराष्ट्राचे नेतृत्त्व आता जहाल गटाकडे झुकले होते. लोकमान्य टिळक हे जहाल गटातील प्रमुख नेते होते. पहिले महायुद्ध सुरु होण्यापूर्वी एक महिना आधी म्हणजेच १६ जून १९१४ रोजी लोकमान्य टिळक यांची मंडाले तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. १९०८ ते १९१४ सालापर्यंत ते म्यानमारमधील तुरुंगात होते.

पहिले महायुद्ध

पहिले महायुद्ध

दरम्यान युरोपीय देशांत असलेली सत्ताकांक्षा लोप पावत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात साशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी अशाप्रकारे सबंध जगात एक जीवघेणी स्पर्धा सुरु झाली! युरोपीय देशांच्या जगभर वसाहती असल्याने त्याचे पडसाद सबंध जगात उमटत होते. जगभरातील या तणावाचे अखेर पहिल्या महायुद्धात पर्यवसन झाले. २८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रिया-हंग्री देशाने सर्बिया विरुद्ध युद्ध घोषित केले. त्यानंतर या युद्धात जगातील इतर देशही ओढले गेले. या महायुद्धामध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला. त्यामुळे जीवत व वित्त हाणीस काही सुमार राहिला नाही. परंतु अमेरिकेत मात्र या काळात औद्योगिकरणास चांगली चालना मिळाली. कामगारांची मागणी वाढल्याने तेथील स्त्रियांना परिणामतः पूर्वीपेक्षा अधिक अधिकार प्राप्त झाले. पहिले महायुद्ध ११ नोव्हेंबर १९१८ साली संपुष्टात आले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!