१७. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : पास्कलाईन

यादरम्यान पास्कल यांनी अथक प्रयत्न करुन एक मेकॅनिकल कॅलक्युलेटर तयार केला. १६४५ साली त्यांनी त्याचे सर्वांसमोर सादरीकरण केले. या कॅलक्युलेटरच्या सहाय्याने बेरीज व वजाबाकी करता येत असे. ‘अरिदमॅटिक मशिन’ नावाचे हे कॅलक्युलेटर पुढे ‘पास्कलाईन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या यंत्रात गिअरचा कौशल्याने वापर करण्यात आला होता. ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’मध्ये वापरण्यात आलेले गिअरचे तंत्रज्ञान हे कधीही पूर्णपणे विस्मृतीत गेले नाही, तर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शेकडो वर्षं टिकून राहिले, याचा ‘पास्कलाईन’ हा जणू एक पुरावा होता! गिअरचा कल्पकतेने वापर करुन तयार करण्यात आलेली अशाप्रकारची निरनिराळी यंत्रे रिनेसॉन्सच्या काळात सर्वत्र दिसू लागली होती.

पास्कलाईन

अरिदमॅटिक मशिन – पास्कलाईन

पास्कल यांनी फ्रांसच्या राजाकडून आपल्या यंत्राकरिता पेटंटसदृश हक्क मिळवले, तसेच आपल्या यंत्राचे व्यवसायिकरण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. भविष्यात अशाचप्रकारे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने उद्योगधंद्यांची जडणघडण होत गेली. म्हणूनच पास्कल यांनी त्यासंदर्भात दाखवलेली दृष्टी विशेष उल्लेखनीय ठरते.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!