‘बेन्यू’ या खगोलीय पिंडावर पाणी असल्याची माहिती समोर आली आहे.

बेन्यू

‘बेन्यू’ हा खगोलीय पिंड

भविष्यात पृथ्वीवर आदळू शकेल अशा ‘बेन्यू’ या खगोलीय पिंडाच्या दिशेने नासाने दोन वर्षांपूर्वी एक तपासयान पाठवले होते, ते काही दिवसांपूर्वी या पिंडाजवळ पोहोचले आहे. या तपासयानाकडून आता पिंडाशी निगडित महत्त्वाची माहिती हाती येऊ लागली असून बेन्यूवर पाणी असल्याचे या महितीतून स्पष्ट झाले आहे. बेन्यूवरील घटकांचा ओलावा पाहून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. ‘बेन्यू’ हा सूर्यमालेची निर्मिती झाल्यानंतर उरलेल्या प्राचीन अवशेषांचा एक भाग मानला जातो. या खगोलीय पिंडाच्या अभ्यासातून सूर्यमालेची प्रारंभीची स्थिती आणि ग्रहांची निर्मिती यासंदर्भातील आपल्या ज्ञानात मोलाची भर पडू शकेल.

Advertisements
error: Content is protected !!