‘मराठीची लाज वाटते का?’ असा प्रश्नार्थक जाब विचारणे हे मराठीची लाज बाळगत असण्याचे द्योतक आहे.

‘मराठीची लाज वाटते का!?’ असा जेंव्हा तुम्ही समोरच्याला जाब विचारता, तेंव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतः मनाच्या एका कोपऱ्यात मराठीची कुठेतरी लाज बाळगता हे नकळतच सर्वांसमोर व्यक्त होऊन जाते!

तुम्हाला स्वतःला जर मराठीची अजिबात लाज वाटत नसेल, आणि समोरच्याला मराठीची खरोखर लाज वाटत असेल, तर तुम्ही त्याच्याकडे उद्विग्न होऊन रागाने जाब विचारणार नाही! अशावेळी एकतर तुम्ही त्याच्याकडे स्पष्ट शब्दांत आपला हक्क मागाल किंवा अगदी शांतपणे त्याची मूर्खांत गणना कराल!

परी अमृतातेही पैजा जिंके

स्वतःसाठी स्वतःच्या मनात मराठीचा मुद्दा खरोखर सिद्ध झालेला आहे का? यावर एकदा आत्मचिंतन करा. तुमचा स्वतःचा आत्मविश्वास हाच मराठीचा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी आपणाला जगाच्या या गर्दीमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करावे लागेल. यासाठी सतत शिकत राहा, आपली गुणवत्ता आणि दृष्टी वाढवत राहा. कारण यातूनच अखेर मराठी महाराष्ट्राचा उत्कर्ष होणार आहे!

Advertisements
error: Content is protected !!