नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या वर्षाच्या तिमाहीत युट्युबवरून कोट्यवधी फिती आणि टिप्पण्या काढून टाकण्यात आल्या आहेत.

युट्युबसंकेतस्थळावरील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २०१८ सालच्या तिसऱ्या तिमाहीत युट्युबने तब्बल ५.८ कोटी फिती आणि २२.४ कोटी टिप्पण्या आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकल्या असल्याचे समजते. या कामाकरिता गुगल कडून नियमबाह्य फिती आपोआप ओळखू शकणाऱ्या साधनांचा वापर केला गेला, तसेच केवळ अशा साधनांवर विसंबून राहता येत नसल्याने या साधनांसोबतच गुगलने युट्युबवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल दहा हजारांहून अधिक प्रशासकांची नियुक्ती केली होती. लोकांनी युट्युबकडे केलेल्या तक्रारींची युट्युबवरील या प्रशासकांमार्फत दखल घेतली जाते. संकेतस्थळ लोकोपयोगी आणि सुरक्षित ठेवणे स्वतः यूट्यूबसाठी तर गरजेचे आहेच, पण समाजविघातक गोष्टी युट्युबवरून ताबडतोब हटवण्यात याव्यात यासाठी जगभरातील निरनिराळ्या सरकारांचा देखील त्यांच्यावर मोठा दबाव आहे.

Advertisements
error: Content is protected !!