६ डिसेंबर २०१८ रोजी, म्हणजेच परवा दिवशी वर्डप्रेसची बहुप्रतिक्षित आवृत्ती ५.० जारी होत आहे! ‘गुटेनबर्ग एडिटर’ हे या आवृत्तीचे प्रमुख आकर्षण असेल!

योगायोगाची गोष्ट अशी की मी माझा पहिला मराठी ब्लॉग सुरू केला त्यास ६ डिसेंबर रोजी ११ वर्षं पूर्ण होत आहेत. हा पहिला ब्लॉग मी ‘ब्लॉगर’वर सुरू केला होता, त्यानंतर काही वर्षांनी मी होस्टिंग घेतले आणि त्यावर वर्डप्रेस ब्लॉग होस्ट केला. एकदा वर्डप्रेसवर आल्यानंतर मी पुन्हा ब्लॉगरकडे वळून पाहिले नाही; नाही म्हणायला माझा खास कवितांचा ब्लॉग मात्र अजूनही ब्लॉगरवर आहे!

गुटेनबर्ग एडिटर - वर्डप्रेस

वरडप्रेसवरील गुटेनबर्ग एडिटर

तर परवा दिवशी वर्डप्रेसची ५.० क्रमांकाची आवृत्ती प्रकाशित होत आहे. एव्हाना वर्डप्रेसने प्लगइनच्या माध्यमातून ‘गुटेनबर्ग एडिटर’ वापरून पाहण्याची पूर्वसंधी दिली होती, पण आता हा एडिटर वर्डप्रेसमध्ये अधिकृतरित्या समाविष्ट करण्यात येणार आहे. गुटेनबर्ग एडिटरच्या माध्यमातून अनुपत्र (blog post) लेखनासाठी ‘ब्लॉक’ पद्धत स्वीकारण्यात आली असून यामुळे अनुपत्र लिहिणे अधिक सुटसुटीत, सोपे व परिणामकारक होईल.

Advertisements
error: Content is protected !!