२०१९ सालच्या जानेवारी महिन्यात शाओमी ४८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा फोन आणणार आहे.

शाओमी ४८ मेगापिक्सल कॅमेरा

शाओमीचा ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा

या वर्षाच्या सुरुवातीला सोनी आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी स्मार्टफोनसाठी ४८ मेगापिक्सल इमेज सेंसर निर्माण केले असल्याची घोषणा केली होती. आता स्मार्टफोन क्षेत्रातील निरनिराळ्या कंपन्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा आपल्या स्मार्टफोनमध्ये अंतर्भाव करण्यास सुरुवात केली असून शाओमीने ४८ मेगापिक्सलचा आपला पहिला स्मार्टफोन पुढील महिन्यात (जानेवारी २०१९) आणण्याची घोषणा केली आहे. या फोनमध्ये मागील बाजूस एकंदरीत तीन कॅमेरे असण्याची शक्यता असून त्यापैकी एक कॅमेरा हा ४८ मेगापिक्सलचा असेल. या फोन मधील समोरचा कॅमेरा फोन अंतर्गत असल्याचे सांगितले जात आहे. हा एक उच्चस्तरीय (High-end) फोन असल्याने सुरुवातीच्या काळात त्याची किंमत जास्त असेल!

Advertisements
error: Content is protected !!