४३. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण

‘संगणकाचा शोध कसा लागला?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे झाल्यास संगणकाच्या वाटचालीचा विचार दोन प्रमुख टप्यांमध्ये करावा लागेल. ‘मेकॅनिकल संगणक’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक संगणक’ असे ते दोन टप्पे आहेत. मेकॅनिकल संगणकाचा विचार करता त्याचे श्रेय निर्विवादपणे चार्ल्स बॅबेज यांना दिले जाते. परंतु आपण जेंव्हा इलेक्ट्रॉनिक संगणकाचा विचार करतो, तेंव्हा मात्र संगणकाचा इतिहास काळजीपूर्वक तपासावा लागतो. कधीकधी काही गोष्टी या पुराव्यांच्या कसोटीवर सहजासहजी सिद्ध होऊ शकत नाहीत, तेंव्हा त्या गोष्टींची फारशी दखलही घेतली जात नाही. सहाजिकच अशा गोष्टी अनेकदा विस्मृतीत निघून जातात.

द ग्रेट डिप्रेशन

द ग्रेट डिप्रेशन

१९३० च्या दशकात जगात ‘द ग्रेट डिप्रेशन’ म्हणजेच ऐतिहासिक महामंदी सुरु होती. घटलेला व्यापार, त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी, महागाई अशा संकटांनी संबंध जगास पुरते ग्रासले होते. इकडे महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीने वेग पकडला होता. लोक गांधीजींच्या विचारांनी भारावून गेले होते. त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना समान हक्क मिळावेत याकरिता मोठे कार्य उभे केले होते.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!