मायक्रोसॉफ्ट ऑफिस कमीत कमी दरात कसे विकत घ्यावे?

मायक्रोसॉफ्ट ऑफिस कसे विकत घ्यावे? ते आपण पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने पाहणार आहोत.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस का विकत घ्यावे?

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, वनड्राइव्ह अशा निरनिराळ्या अॅप्लिकेशन्सचा समावेश होतो. आपल्याला जर या साऱ्या ॲप्लिकेशन्सचे वेळोवेळी अपडेट्स हवे असतील किंवा जर अगदी स्वस्तात क्लाऊड स्टोरेज हवे असेल, तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घ्यावे लागते.

मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा कोणता प्रकार विकत घ्यावा?

सर्वसाधारण ग्राहकासाठी ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस पर्सनल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम’ असे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस पर्सनलचा उपयोग केवळ एक जण करू शकतो, तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस होमचा वापर एकूण पाच जण करू शकतात. असे असले तरी या दोन प्रॉडक्टच्या किमतींमध्ये केवळ दीड हजार रुपयांचे अंतर आहे. तेंव्हा आपली एकंदरीत गरज लक्षात घेऊन आपण स्वतः योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिसची गरज असेल किंवा आपल्याला स्वतःला जर १ टीबी हून अधिक क्लाऊड स्टोरेज लागत असेल, तर ऑफिस होमची निवड करणे योग्य ठरेल.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम

मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम

मायक्रोसॉफ्ट ऑफिस कुठून विकत घ्यावे?

थेट मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरून, ऑनलाइन शॉपिंग साईट वरून किंवा दुकानातून आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेऊ शकतो. पण आपणाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस अगदी स्वस्त दरात हवे आहे, तेंव्हा ते ऑनलाईन शॉपिंग साईट वरून विकत घ्यावे.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस कधी विकत घ्यावे?

जेंव्हा फ्लिपकार्टवर ‘बिग बिलियन डे’ किंवा ॲमेझॉनवर ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल’ सुरू असतो, तेंव्हा आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसची प्रत विकत घेऊन ठेवावी, कारण या काळात ती आपणाला सवलतीच्या दरात मिळेल. त्यानंतर आपल्याला गरज असेल, तेंव्हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्टिव्हेट करता येईल.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस कसे सुरु करावे?

मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्टिव्हेट करण्यापूर्वी आपले जर आधीचे सबस्क्रीप्शन असेल, तर ते संपू द्यावे आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस ‘लायसन्स की’ वापरून मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरून ते नव्याने ऍक्टिव्हेट करावे. अशाने आपल्याला मायक्रोसॉफ्टकडून एक महिना अतिरिक्त मिळू शकेल. त्यामुळे आपली आणखी थोडी बचत होईल.

Advertisements
error: Content is protected !!