सर्वोत्तमाच्या अपेक्षेतून तणावरहित आयुष्याकडे!

सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप असे आहे की त्यात मानवावर अधिकाधिक उत्पादक होण्याविषयी सातत्याने दबाव निर्माण करण्यात येतो. या नीतीमुळे मानवी जीवनातील ताण वाढले असल्याचे वरकरणी भासत असले, तरी प्रत्यक्षात मानवी आयुष्यातील तणाव मात्र निवळले आहेत. उदाहरणार्थ, रोज रहदारीतून वाट काढत कार्यालयात पोहचणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे हा एक ताण असू शकतो, परंतु क्षुल्लक आजाराने, वितंडवादाने प्राण गमवावा लागण्याचा तणाव मात्र आजच्या काळात निवळला आहे.

मानवी उत्क्रांतीला चालना

सुखशांती
वस्तुनिष्ठ विचारांतून सुख-शांती वृद्धिंगत होते

मानवाला सुंदरशी स्वप्ने दाखवून, त्याच्या आर्थिक गरजा वाढवून त्याच्या खिशाला सतत चणचण भासेल अशी परिस्थिती राखणे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कर्तव्य आहे. अशाप्रकारे भविष्यातील स्वप्नांमध्ये केलेली गुंतवणूक ही वर्तमानात जपावी लागते. परिणामी रिकामा मेंदू इकडे-तिकडे अवास्तव न भटकता उत्पादनक्षमतेच्या दिशेने कार्यरत होतो, लहान-सहान विषयात वेळूर्जा न दवडता माणूस व्यापकतेवर आपली दृष्टी खिळवतो. व्यापकदृष्टीतून मानवी उत्क्रांतीला चालना मिळते, आयुष्याचे आकलन वाढते. पर्यायाने वस्तुनिष्ठ विचारांतून आयुष्यातील सुख-शांती वृद्धिंगत होते.

सर्वोत्तमाला व्यवस्थापनाची जोड

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत प्रत्येक माणसाकडून सर्वोत्तमाची अपेक्षा केली जाते. अपेक्षेच्या या ओझ्याखाली ताण निर्माण होणे सहाजिक आहे. म्हणूनच मानवी जीवनातील या ताणाचे योग्य व्यवस्थापन करायला हवे. अशाप्रकारे सर्वोत्तमाच्या ध्यासाला व्यवस्थापनाची जोड दिल्यास भविष्यात तणावरहित आयुष्य साकार करणे शक्य आहे.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!