शांतता व्यक्त होत असते!

आयुष्यात प्रत्येकाला काही बोलायचे असते, व्यक्त व्हायचे असते, परंतु प्रत्येकवेळी बोलण्यासारखे कोणी असेलच असे नाही. अशावेळी माणूस शांत राहतो. तरी ही शांतता देखील व्यक्त होत असते. ती तिच्या मनातल्या विषयावर कोणी बोलेल या प्रतीक्षेत असते. जेंव्हा असे कोणी मोकळ्या मनाचे, विश्वासाचे भेटते, तेंव्हा शांतताही मनापासून बडबडू लागते.

शांतता
शांतता देखील व्यक्त होत असते

मनातला विषय जाणावा

त्यामुळे एखादी व्यक्ती जर शांत असेल, तर मुळात ती व्यक्ती शांत नसून त्या व्यक्तीचा विषय वेगळा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपण त्या व्यक्तीच्या मनातील विषय जाणला नि त्यानुसार संवाद साधला, तर ती व्यक्ती आपल्याजवळ सहजतेने मोकळी होऊ लागते. अर्थात एखादी व्यक्ती बोलण्यात कमी पडत असेल, तर आपणही जाणण्यात कमी पडत आहोत हे आपल्या लक्षात यायला हवे.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!