उत्तेजकता आणि आश्वस्तता!

माणसाच्या आयुष्यातील चढ-उतार हे एखाद्या कंपनीच्या आलेखाप्रमाणे असतात. काही लोक गुण्यागोविंदाने सरळमार्गी प्रवास करतात, तर काहीजण दऱ्याखोऱ्यातून आपली वाट काढत पुढे जातात. यात कोणी योग्य वा अयोग्य असे नसून प्रत्येकाचे आपापले एक निसर्गदत्त आयुष्य आहे. सरळमार्गी आयुष्यात उत्तेजकता कमी, तर आश्वस्तता जास्त असते. याउलट दऱ्याखोऱ्यातील प्रवासात आश्वस्तता कमी, तर उत्तेजकता अधिक असते. उत्तेजकता चित्ताकर्षक व मनोरंजक असली, तरी आयुष्यात प्रत्येकाला कुठेतरी आश्वस्तता हवी असते.

मार्ग
उत्तेजकता आणि आश्वस्तता

जे लोक वेगळी वाट निवडतात, ते यशस्वी झाल्यास खूप यशस्वी होतात, पण बहुतांश लोक अयशस्वीच राहतात. त्यामुळे वेगळ्या वाटेचे आकर्षण वाटले, तरी सहसा अशी वाट पकडण्यास कोणी धजत नाही. मात्र जगावेगळी वाट पकडून जे सरतेशेवटी यशस्वी होतात, त्यांचे त्यांना मनोमन कौतुक वाटत राहते. दुसरीकडे जे दऱ्या-खोऱ्यातील चढ-उताराने थकलेले असतात, त्यातील काट्याकुट्यांनी घायाळ झालेले असतात, त्यांना सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या माणसांचा कुठेतरी हेवा वाटल्याशिवाय रहात नाही.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!