विश्वास ठेवावा की तर्क लढवावा!?

सल्ला हा समोरच्यावरील विश्वासाने किंवा स्वतःच्या तर्काने पारखून स्वीकारला जातो. या दोन्ही मार्गांचा आपापला फायदा नि तोटा आहे. कारण विश्वास टाकायचा झाल्यास समोरच्या व्यक्तीत तशी गुणवत्ता असावी लागते, आणि तर्क लढवायचा झाल्यास आपणात ती गुणवत्ता असावी लागते. इथे विश्वासाचा मार्ग योग्य की तर्काचा? हे विषयसापेक्ष असते.

जाणकार
खरा जाणकार जाणावा

खरा जाणकार जाणावा

जाणकाराचा सल्ला केवळ त्याच्या शब्दाखातर स्वीकारल्यास आपल्याला तर्क न लढवता विनासायास फायदा होऊ शकतो. पण जो जाणकार भासतो, तो जाणकार असतो का? हा खरा प्रश्न आहे. अन्यथा आपले अनन्यसाधारण नुकसान देखील होऊ शकते. याउलट जाणकाराचा सल्ला न ऐकता आपला स्वतःचा तर्क लढवल्याने देखील नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्वतःचा तर्क तेंव्हाच लावावा, जेंव्हा एखाद्या विषयात आपल्याला खरोखर गती असते.

परिस्थितीजन्य सौदा घ्यावा

विश्वास टाकल्याने अल्पमुदतीत आपला फायदा होऊ शकतो, परंतु दीर्घमुदतीत आपण परावलंबी होतो. याउलट तर्क लढवल्याने अल्पमुदतीत आपला तोटा होऊ शकतो, परंतु दीर्घमुदतीत आपण स्वावलंबी बनतो. चांगला सौदा हा अल्पमुदतीचा किंवा दीर्घमुदतीचा नसतो, तर तो तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपण विश्वास टाकावा की तर्क लढवावा? हे त्यावेळच्या परिस्थितीनुसार ठरवावे.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!