महाराष्ट्राने या जगाला सुखद धक्का द्यावा!

चार दिवसांचा प्रवास जर अचानक चार तासांचा झाला, किंवा चार तासांचा प्रवास जर अनपेक्षितपणे चाळीस मिनिटांवर आला, तर आपल्याला जो सुखद धक्का बसेल, अशाच सुखद धक्क्याची प्रतिक्षा माणसाला जीवनाच्या प्रत्येक अंगाने असते. अनेक विवंचना उराशी बाळगून आयुष्याचा स्वीकार करत चालत असताना सर्वांनाच एखादा चमत्कार हवा असतो. महाराष्ट्राने मानव जातीसाठी असाच एक चमत्कार बनून तळपावे, जे कालपर्यंत अशक्य होते, ते आज शक्य करावे, आणि जगाला प्रगतीच्या दिशेने सुखद धक्का देत रहावे! अशी माझी महाराष्ट्राप्रती असलेली मनोकामना आज महाराष्ट्र दिनादिवशी मला व्यक्त करावीशी वाटते. 

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशक्य ते शक्य करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या व्यक्तिगत पातळीवर सहजशक्य आहे. त्यासाठी आपले जे काही काम असेल, ते केवळ किंचीत मन लावून, सचोटीने करावे इतकेच! नि मग नकळतच अशक्य ते शक्य होऊन मूर्तरुपात साकार होऊ लागल्याचे आपल्याला दिसू लागेल. समस्त विश्वाने प्रगती करावी आणि महाराष्ट्राने त्यास दिशा द्यावी! जय महाराष्ट्र!

error: Content is protected !!