स्वस्त होणे-महागणे जागृतावस्थेत येणे-जाणे

एखादी गोष्ट स्वस्त वा महाग ‘असणे’ हे निसर्गनियमाने सापेक्ष आहे. त्यामुळे इथे आपण ‘असणे’ ऐवजी ‘भासणे’ असे देखील म्हणू शकतो. कोणतीही गोष्ट ‘स्वस्त’ होत नाही, तर ती केवळ ‘परवडू लागते’. तसेच कोणतीही गोष्ट ‘महाग’ होत नाही, तर ती केवळ ‘आवाक्याबाहेर जाते’. थोडक्यात स्वस्त वा महाग असणे हे परवडणे वा आवाक्याबाहेर जाणे आहे.

सिद्ध ते स्वस्त
सिद्ध होऊन प्रकटते ते स्वस्त होते

स्वस्त होणे हे सिद्ध होऊन प्रकटणे

पण मुळात परवडणे किंवा आवाक्याबाहेर जाणे म्हणजे काय? याचा देखील वेध घ्यायला हवा. एखाद्या गोष्टीचा वापर वाढतो, तशी ती कालौघात परवडू लागते. अर्थात एखादी गोष्ट अधिकाधिक जागृतावस्थेत येऊ लागते, तशी ती अनुभूतीत सिद्ध होऊन प्रकट होऊ लागते. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जागृतावस्थेतून जसजशी बाहेर पडू लागते, तशी त्या गोष्टीची सिद्धता ओसरून ती अप्रकट होऊ लागते. थोडक्यात स्वस्त होणे हे जागृतावस्थेत प्रकट होण्यासारखे, तर महाग होणे हे जागृतावस्थेतून अप्रकट होण्यासारखे आहे.

अशाचप्रकारे एखादी गोष्ट जेंव्हा नव्याने जागृतावस्थेत येते, तेंव्हा देखील ती महाग असते. ती सामाजिक जागृतावस्थेत स्थिरस्थावर होऊ लागतातच स्वस्त होत जाते. यालाच ‘विस्तृत अर्थकारण’ (Economy of Scale) असे म्हणता येईल.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!