विचारप्रवाह संग्रह

रुग्णाचे हित साकल्याने जपले जावे!

अॅलोपॅथीची आयुर्वेदाशी सांगड घालण्याची तसदी अनेकदा घेतली जात नाही, आणि त्याची किंमत रुग्णाला सोसावी लागते. तेंव्हा अशाप्रकारचे प्रशिक्षण हे डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाचाच भाग असायला हवे असे मला वाटते.

अवघड काम सोपे होत आहे!

स्वयंचलित यंत्रणेमुळे सरकारी कारभारात आलेली पारदर्शकता आणि खाजगी व्यवहारास प्राप्त झालेली गती विशेष उल्लेखनीय आहे. यंत्रप्रणालीची मदत आणि मुक्तस्पर्धा या माध्यमातून सहकार्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होते.

नववर्षात सर्वोत्तम होण्याची कास धरूया!

इतरांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी असे जेंव्हा आपल्याला वाटते, तेंव्हा आपणही आपल्या ठिकाणी कर्तव्यदक्ष असायला हवे. म्हणूनच या नवीन वर्षात सर्वांनीच आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास बाळगावा.

जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात!

आत्मविकास हेच भौतिक विकासामागील खरे साध्य आहे याची जाणीव ठेवावी. एक वर्ष, एक दशक संपत असताना आपणही सूर्याप्रमाणे नित्यनव्या तेजाने तळपावे हिच याप्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो.

शरीरमन विश्वाच्या जाणिवेत यावे!

मनाची आणि मनातील स्मृतींची जागा निश्चित करावी. विश्वातील शरीरमनाच्या अस्तित्वाची मर्यादा लक्षात आल्यास सारे शरीरमन या विश्वाच्या जाणीवेत येते, जी अर्थातच चैतन्यदायी असते.

माणूस देवात स्वतःचे सर्वोत्तम स्वरूप शोधतो!

माणूस देवामध्ये आपले स्वतःचे सर्वोत्तम स्वरूप शोधत असतो. तो देवाला स्वतःपलीकडे मानत असला, तरी नकळत स्वतःला देवात पहात असतो.

शिरस्त्यातून स्थिरचित्त व्हावे!

माणसाला आपले चित्त थाऱ्यावर ठेवायचे असेल, तर दिवसाला शिरस्ता असणे अगत्याचे आहे. नित्यनेमाने काही गोष्टी करत राहिल्यास चित्त जागेवर खिळून राहण्यास मदत होते. पर्यायाने आपणही कुठे दूर भरकटत न जाता स्थिर होतो.

चौकस एकाग्रता असावी!

एकाच विषयात एकाग्र झाल्याने गती मिळते, परंतु अनेक विषयांची सांगड घातल्याने प्रगती होते. चौकटीतील जग जगण्यासाठी एकाग्रता रहावी, तसे चौकटीबाहेरील जग पाहण्यासाठी चौकसता असावी.

स्वयंचलनातून एकमेवाद्वितीय व्हावे!

आपल्याशिवाय होऊ शकते असे प्रत्येक काम आपण इतरांकडून करून घ्यायला हवे. अशाप्रकारे आयुष्यात स्वयंचलन आणल्यास आपले व्यक्तिमत्त्व आपसूकच एकमेवाद्वितीय होऊ लागेल.

स्वतःला विचार करताना पहावे!

आपण स्वतःला पाहतो, स्वतःबद्दल विचार करतो, पण स्वतःला विचार करताना पहात नाही. परिणामी आपले स्वतःच्या सापेक्षतेतून विश्व पाहणे होते, परंतु विश्वाच्या सापेक्षतेतून स्वतःला पाहणे होत नाही.
error: Content is protected !!